भजनी मालिका
← भजनांकडे परत

कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि

kas ghaloni balakat | jhalon kalikalavari nit | keli payavat | bhavasindhuvaruni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥ कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥ एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥