भजनी मालिका
संत रामदास

संत रामदास

या संतांची भजने

त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ।। तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ।।

रचनाकार: संत रामदास

दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।।

रचनाकार: संत रामदास

देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।

रचनाकार: संत रामदास