भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं । तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥ सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा । नलगे कांही घेणें देणें परि हा तो जवळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कराल सांभाळ तरी ते तुमची कीर्ति । मी तों बाळमति नेणें दुजें ॥१॥ बैसलों विश्वासें आळवित नांवा । तुमच्या दयार्णवा निरंतर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करितां उसी हातां नये चेंडु गमाविला । धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥ म्हणती म्हणे कीर । नाहींतरी घेंई फेर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करितांचि सीमा उल्लंगन । म्हणती अक्रूरा ऐकें वचन । तुवां जावें रथ घेऊन । सांगावें वर्तमान रायासी ॥१॥ तेणें आज्ञा वंदुनी शिरीं । चालिला पुढें वेगें करी । बळराम कृष्ण गोवळ भारी । आले बळिया रजकापें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करीन कैवाड हाचि अनुदिनीं । तुमच्या चिंतनीं पांडुरंगा ॥१॥ नेदीं जाऊं वांयां घटिका एकी पळ । करुं सर्वकाळ हेचि चर्चा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करुं येईल अंगिकार । तरी करा फार काय बोलों ॥१॥ नाहीं घोंकिलें ऐकिलें कांहीं । सेवा घडली नाहीं वैष्णवांची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कर्मे वांटिलीं चहूं वर्णा । क्षत्रिय वैष्य आदि ब्राम्हणा । वेदपुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥१॥ यज्ञ षटकर्मे ब्राहमाणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी । कृषीगोरक्षवाणिज्य वैश्यासी । सेवा शूद्रासि याचिते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कल्पोकल्पीं युगायुगीं । व्यवसाय हाचि तुम्हांलागीं ॥१॥ करावें दासाचें पाळण । निवारुनि त्यांचा शिण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥ न सांगतां कळे सर्व अंतरींचें । सकळही जीवाचें मनोगत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिली चित्तीं ॥१॥ तेचि देव झाले अंगे । अहंमोह ममतात्यागें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कवण्या योगें तल्लिनता । ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥ हें मी नेणें गा श्रीपती । तुमची करणी तुम्हां हातीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कंसराया पूजितें नित्य । परि तो असुरचि उन्मत । काय पुरवील मनींचा हेत । दासी किंकर मी त्याची ॥१॥ परमात्मा हा सर्वेश्रवर । कृष्ण सुंदरा अतिसुंदर । चर्चनमिसें लावीन कर । अति मनोहर करीन पूजा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा