भजनी मालिका
← भजनांकडे परत

कराल सांभाळ तरी ते तुमची कीर्ति । मी तों बाळमति नेणें दुजें

karal sambhal tari te tumachi kirti | mi ton balamati nenen dujen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कराल सांभाळ तरी ते तुमची कीर्ति । मी तों बाळमति नेणें दुजें ॥१॥ बैसलों विश्वासें आळवित नांवा । तुमच्या दयार्णवा निरंतर ॥२॥ नुपेक्षाल मज हा वाटे भरंवसा । आहे कीर्तिठसा तुमचा जगीं ॥३॥ निळा म्हणे नेणें दुजी परी आतां । येईल तें चित्ता सुखें करा ॥४॥