भजनी मालिका
← भजनांकडे परत

कवळूनियां कृपामोहें । माझे संदेह निरसिले

kavaluniyan krupamohen | majhe sandeh nirasile

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कवळूनियां कृपामोहें । माझे संदेह निरसिले ॥१॥ लांचाविली माझी वाणी । आपल्या गुणीं वळुनियां ॥२॥ नाचों शिकवितां पुढें । धरुनियां कोडें करकमळीं ॥३॥ निळा म्हणे माझीं गात्रें । तुम्हीं सूत्रें चेष्टविलीं ॥४॥