भजनी मालिका
← भजनांकडे परत

कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं । तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी

kapal jheti mise bot lavitesi lallatin | tenchi naman arpi bai kanho jagajethi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कपाळ झेटि मिसे बोट लावितेसी लल्लाटीं । तेंचि नमन अर्पी बाई कान्हो जगजेठी ॥१॥ सहलाचिया खेळा गे जोडि घननीळा । नलगे कांही घेणें देणें परि हा तो जवळा ॥२॥ नमन हेंचि निज गे परमार्थाचें बिज । सहज भावें नमुं जातां जोडे अघोक्षज ॥३॥ निळा महणे आतां गे वर्म आले आतां । श्रीहरीच्या संगसुखें गाऊं गुणकथा ॥४॥