भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुं येईल अंगिकार । तरी करा फार काय बोलों

karun yeil angikar | tari kara phar kay bolon

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करुं येईल अंगिकार । तरी करा फार काय बोलों ॥१॥ नाहीं घोंकिलें ऐकिलें कांहीं । सेवा घडली नाहीं वैष्णवांची ॥२॥ स्वधर्म विधी न कळें आचार । कैसा तो प्रकार साधनाचा ॥३॥ निळा म्हणें आहें मूढ दगड । ठायींचीच जड बुध्दी माझी ॥४॥