भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

नाम हं अमृत भक्तांसी लाधलें । आपण घेतलें बौध्यरुप ॥१॥ नाम हें आळवा नाम हें आळवा । होईल दोहावा कामधेनु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नाम ह्मणावया तूं कांरे करंटा । काय तुझे अदृष्टां लि-हिलें असे ॥१॥ यमाचे यमपाश पडतील गळां । जाशील सगळा काळामुखीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना ॥१॥ नाम स्मरे त्यांसी संसारचि नाहीं । खुंटली ते पाही वेरझार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामचि हें आहे पंचतत्त्वा ठाव । नाहीं दुजा भाव देखावया ॥१॥ देखणारा जाहाल कर्पुराची वाती । नामाग्निं विश्रांती ठाई जाहाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामदेव घरीं पाहुणे मेहुणे । आले दोघेजण पंढरिसी ॥१॥ राजाईनें बंधु देखुनि दृष्टिसी । उल्हास मानसीं थोर जाला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामदेवा काय करिसी तीळ । उभा अगा ठेलासी दर्भ जैसा ॥१॥ भुका कागा मरसी जेथिंचा तेथें । केशवराज तूतें आतुडेना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाची माता विनवितसे संता । म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥ नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठलीं मीनला नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला ॥१॥ करितां कामधंदा ध्यानीं नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥ धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं ॥१॥ केशव तोचि नामा तोचि केशव । प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥ देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु ॥१॥ जें करकमळ सनकादिकां शिरीं । नामा तिहीं करीं कुरवाळिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं ॥१॥ सर्वत्र चाळक एकचि चैतन्य । वंद्य निंद्य कोण म्हणे स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयासारिखें निधान तुझिये कुसीं । धन्य तूं वो होसी जगामाजीं ॥१॥ धन्य याचें सुख देखियेलें डोळां । प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव