भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु

namayache mukhin ghaluni kavalu | pusatase gopalu shinabhagu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु ॥१॥ जें करकमळ सनकादिकां शिरीं । नामा तिहीं करीं कुरवाळिला ॥२॥ म्हणे सांडी सर्व खंती जीवींची काजळी । विश्रांति मजजवळी आहे तुज ॥३॥ वियोगाचेनि शोकें शिणलासी मार्गीं । देह मजलागीम वाळविला ॥४॥ कोमाईलें वदन निडारला नयनीं । नेणें कोणी तुझी तानभूक ॥५॥ गेलासी जवळुनी ज्या दिवसापासोनी । न दिसे माझें कोणी आवडतें ॥६॥ धीर न धरवे जीवा पाहें दाही दिशा । माझा विष्णुदास येईल केव्हां ॥७॥ तुज पाहे गरुडपारीं पाहे महाद्वारीं । पाहे भीमातीरीं चंद्रभागे ॥८॥ पाहे पद्मतीर्थीम पाहे वेणूनादीं । नलगे तुझी शुद्धी खंत वाटे ॥९॥ अनुदिनीं भोजन करितां उदकपान । तेव्हां आठवण होय तुझी ॥१०॥ मी म्हणे धांवत येसी न धरत । प्रसादाचें आर्त बहु तुज ॥११॥ धांवोनियां येसी आलिंगन देसी । पुसेन सांगसी सुख गोष्टी ॥१२॥ तेणें हर्षें निघती डोळियासी दोंदें । ह्रदय माझें कोंदे करुणारसें ॥१३॥ आवडतें आळुकें जननियेचें बाळ । जाण तें कृपाळ भूक त्याची ॥१४॥ तैसा पंढरीनाथ मोहें वोसरला । नाम्यातें पाजिला प्रेमपान्हा ॥१५॥