भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवाचे घरीं । चोदाजण स्मरती हरी

namadevache gharin | chodajan smarati hari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामदेवाचे घरीं । चोदाजण स्मरती हरी ॥१॥ चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायण ॥२॥ आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥ आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥