भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना

namachi to jane an kanhin nenen | sansar namavinen jaijena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामचि तो जाणे आन कांहीं नेणें । संसार नामाविणें जाईजेना ॥१॥ नाम स्मरे त्यांसी संसारचि नाहीं । खुंटली ते पाही वेरझार ॥२॥ नामा म्हणे त्याचें जळो जालेंपण । आळसी वायांविण संसाराची ॥३॥ नामा म्हणे मज नामींच सौरसु । नाम स्मरे ह्रषिकेशु त्यासी पावे ॥४॥