भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला

namadeva putra jhala | vitho barashasi ala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥ आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥ माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा ॥३॥ जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥