भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥ यापरतें सुलभ आम्हां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे ॥१॥ शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा ॥१॥ भक्तीचें कारण तेणें सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥ पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी ॥१॥ बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिणले ते वेद श्रुती पैं भांडती पुराणांची मती कुंठीत जाहली ॥१॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी । पाउले साजिरी समचि दोन्ही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिणल्या भरल्या विठोबाचें नाम । विश्रांतीचें धाम पंढरपुर ॥१॥ म्हणोनियां करा नामाचाचि लाहो । पंढरीचा नाही पहा डोळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिव ऐसा मंत्र सुलभ सोपा रे । जपावा परिकर नित्य नेमें ॥१॥ न बाधिच विघ्न संसाराचें भान । धन्य तें भजन शिवनामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिव शिव नाम वदतां वाचे । नासे पातक बहुतां जन्माचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचें नाम घेतां हरे काळांचें भेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवनाम उच्चारी । आळस न करी क्षणभरी । महापापा होय बोहरी । नाम घेतां ॥१॥ शिव शिव नाम । जपे कां रे उत्तम । तेणें नासे भवभ्रम । निःसंदेह ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि ॥१॥ हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावें पूजी आधीं शिवलिंग ॥१॥ चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ