भजनी मालिका
← भजनांकडे परत

शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा

shastradnya pandit ho kan vedavakte | pari hari bhajanin rat vandya sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा ॥१॥ भक्तीचें कारण तेणें सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥ मी एक जाणता पैल नेणता । ऐसा विकल्प भाविता पतन जोडे ॥३॥ एका जनार्दनीं विकल्प त्यजोनी । विठ्ठल चरणीं मिठी घाली ॥४॥