वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे
vairagya pratham asavi shanti | tenen virakti angin jode
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥ हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
vairagya pratham asavi shanti | tenen virakti angin jode
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणें विरक्ति अंगीं जोडे ॥१॥ हेंचि मुर्ख वर्म साधतां साधन । येणें जनार्दन जवळी असे ॥२॥
vaishnava bhushan mudranchen shrrungar | tulashi parikar vahati kanthin
वैष्णवा भुषण मुद्रांचें श्रृंगार । तुळशी परिकर वाहती कंठीं ॥१॥ तयांचियां पायीं माझा दंडवत । सदा जे जपत नाम मुखीं ॥२॥
vaishnavagharin dev sukhavala | bahir navaje davadoni ghatila
वैष्णवाघरीं देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥ देव म्हणे माझें पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥
vokhad ghetaliya pathi | jevin hoy rog tuti
वोखद घेतलिया पाठी । जेवीं होय रोग तुटी ॥१॥ तैसें घेतां रामनाम । नुरे तेथें क्रोध काम ॥२॥
vokhad ghetaliya pathin | tenen tuti hoy roga
वोखद घेतलिया पाठीं । तेणें तुटी होय रोगा ॥१॥ पथ्य साचार साचार । नामीं धरा निर्धार ॥२॥
vodavoni man ala rayapashin | nirbhay manasin dharmangad
वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसीं धर्मांगद ॥१॥ घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥
vos ghar vastis kahma | taisen deva kon puse
वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥ सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥
vyaghramukhin sampadatan gay | tethen dhanvanya kon jay
व्याघ्रामुखीं सांपडतां गाय । तेथें धांवण्या कोण जाय ॥१॥ तैसा विषयभोग साचा । भोगितां सुखाचा सुख म्हणती ॥२॥
vyaghramukhin sampade gay | advaitin tun ramanam dhyay
व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥ वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥
vyapak janardanin vyapuni rahila | akhand bharala hrudayasamputin
व्यापक जनार्दनीं व्यापूनि राहिला । अखंड भरला ह्रुदयसंपुटीं ॥१॥ पाहतां पाहणें परतें गेलें दुरी । अवघा चराचरीं जनार्दन ॥२॥
vyapak ten nam anant brahmadin | mana sons sandin kalpanecha
व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥ कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥
vyapak to hari pandhariye rahila | vedandikan abola jayacha to
व्यापक तो हरी पंढरीये राहिला । वेदंदिकां अबोला जयाचा तो ।१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥
vyapak viththal nam tevhachi hoil | jevha ten jail mitumpan
व्यापक विठ्ठल नाम तेव्हाचि होईल । जेव्हा तें जाईल मीतूंपण ॥१॥ आपलें तें नाम जेव्हा वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥
vyapaka ha janardan | jagachi bharala sampurna
व्यापका हा जनार्दन । जगाची भरला संपूर्ण ॥१॥ मागें पुढें आहे उभा । काय वानुं त्याची शोभा ॥२॥
vyapuni jagin tochi urala | to vitevari dekhila ge may
व्यापुनी जगीं तोचि उरला । तो विटेवरी देखिला गे माय ॥१॥ चतुर्भुज पीतंबरधारी । गलां शोभे वरी वैजयंती गे माय ॥२॥
vyapuniyan bharala dev | rita thav kothen pan
व्यापूनियां भरला देव । रिता ठाव कोठें पां ॥१॥ तयाचें करा रे चिंतन । मग तुम्हां न पडे न्यून ॥२॥
vyas valmik narad muni | nitya chintit chintani | yeti pandharapurabhuvanin | shriviththal darushana
व्यास वाल्मिक नारद मुनी । नित्य चिंतित चिंतनी । येती पंढरपुरभुवनीं । श्रीविठ्ठल दरुशना ॥१॥ मिळोनि सर्वांची मेळ । गाती नाचती कल्लोळ । विठ्ठल स्नेहाळ । तयालागीं पहाती ॥२॥
vyasadika gati jyasi | shuk sange parikshitisi
व्यासादिका गाती ज्यासी । शुक सांगे परीक्षितीसी । श्रीकृष्ण उपदेशी उद्धवासी । नाम सार कलींत ॥१॥
vyahi janvayanchya kodi | poshitase ati avadi
व्याही जांवयांच्या कोडी । पोषितसे अति आवडी ॥१॥ देहसुखाचिया चाडा । अवघे मेळविले वोढा ॥२॥
vrajat kone ek veleshi | ale gargacharya rushi | tyasi dakhavitan krushnasi | chinhen bolatan jhala
व्रजात कोणे एक वेळेशी । आले गर्गाचार्य ऋषी । त्यासी दाखवितां कृष्नासी । चिन्हें बोलतां झाला ॥१॥ यशोदेबाई ऐक पुत्राची । लक्षणे ॥धृ ॥