भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय

vyaghramukhin sampade gay | advaitin tun ramanam dhyay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्याघ्रामुखीं सांपडे गाय । अद्वैतीं तूं रामनाम ध्याय ॥१॥ वाचे गांतां रामनाम । निवारेल क्रोधाकाम ॥२॥ भेदभावाची वासना । रामनामें निरसे जाणा ॥३॥ एकपणें जनीं वनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥