भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोखद घेतलिया पाठी । जेवीं होय रोग तुटी

vokhad ghetaliya pathi | jevin hoy rog tuti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वोखद घेतलिया पाठी । जेवीं होय रोग तुटी ॥१॥ तैसें घेतां रामनाम । नुरे तेथें क्रोध काम ॥२॥ घडतां अमृतपान । होय जन्माचें खंडन ॥३॥ एका जनार्दनीं जैसा भाव । तैसा भेटे तया देव ॥४॥