भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकविलें नाईके वचन । वारितां करी कर्म जाण

shikavilen naike vachan | varitan kari karma jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिकविलें नाईके वचन । वारितां करी कर्म जाण ॥१॥ न देखे आपुले गुणदोष । पारावियाचे बोले निःशेष ॥२॥ न करावें तें करी । न बोलावें तें बोले निर्धारीं ॥३॥ न मानीं स्वयातीचा आचार । सदा करी अनाचार ॥४॥ शिकविलें गेलें वायां । शरण एका जनार्दनीं पायां ॥५॥