भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि

shivanamachi kavad khandin | amhin ghetali samatabuddhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिवनामाची कावड खांदीं । आम्हीं घेतली समताबुद्धि ॥१॥ हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥ मागें बहुतीं घेतली खांदीं । ते उतरले पैलपार भवनदी ॥३॥ ज्ञानदेव कावड घेतां । सुख समाधान वाटे चित्ता ॥४॥ निवृत्ति सोपान चांगदेव भारी । कावडीचे अधिकारी ॥५॥ एका जनार्दनीं त्यांचा दास । कावड घेतां बहु उल्हास ॥६॥