भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिवनाम उच्चारा । तेणें कळिकाळासी दरारा

shivanam uchchara | tenen kalikalasi darara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शिवनाम उच्चारा । तेणें कळिकाळासी दरारा ॥१॥ ऐसा नामाचा महिमा । न कळेचि आगमां निगमां ॥२॥ सकळ मंत्राचें माहेर । शिवमंत्र पंचाक्षर ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । शिवनाम जपा साचें ॥४॥