भजनी मालिका

भजने

स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां ॥१॥ सोळा सहस्र स्त्रिया उटणीं लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्नेह सरतां जैसा दीन । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईंचे स्वरुप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥ नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केलें निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्हीही निघालों तेथुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्पर्श कराल मजसी तरी विठोबाची आण । ऐकतांचि वचन मागें फ़िरे ॥१॥ जनमुखें सर्व कळाला समाचार । परि अंतरी साचार व्यग्र नोहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये ॥१॥ आणखी दुजें नावडे कांहीं । येचि प्रवाहीं सुखावली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्मरण स्वयाती नलगे ती जपमाळ हातीं । नाठवितां चित्तीं स्मरण होय ॥१॥ तैसा देहीं देवो परिसुनीं भावो । नाठव तोचि आठवो होत असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्मरता निवृत्ति पावलो विश्रांती । संसाराची शांती जाली माझ्या ॥१॥ नमितां ज्ञानदेवा पावलो विसावां । अंतरींचा हेवा विसरलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वगोत्र परगोत्र यांचा भरंवसा । मानूं नये सहसा अरे मूढा ॥१॥ वेदींचें वचन वेदीं तें प्रमाण । एक नारायण सार जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वजनीं जनार्दन विजनीं जनार्दन । जीव तो जनार्दन जीवनकळा ॥१॥ जनक जनार्दन जननी जनार्दन । जन तो जनार्दन होऊनी ठेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधें ॥१॥ दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ।। स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ।।

रचनाकार: संत रामदास

स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें ॥१॥ काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ