भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा

smashanin amhan nyahalichen sukh | ya nanven kautuk tumachi krupa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥ झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मीं केलें ॥२॥ तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥