भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधें

svati shrinagar dvarakapuriche | shriranachhodajiche sevemadhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वति श्रीनगर द्वारकापुरीचे । श्रीरणछोडजीचे सेवेमधें ॥१॥ दासानुदास चरणरज साचार । विनंती अपार लिहितसे ॥२॥ यात्रेकरी यानें राखिले रुपये । तीन शतें साठ द्यावे यांसी ॥३॥ ऐसें पत्र दिलें हुंडी ते लिहून । नगरीचे बाम्हण पाचारिले ॥४॥ बोलावुनी त्यांसी वांटी दक्षिणेसी । यात्नेकरी यासी विस्मय वाटे ॥५॥ म्हणती धर्मात्मा सुशील मेहता । दानशूर दाता जगीं खरा ॥६॥ घेवोनी द्रव्यातें दिलें ब्राम्हणांसी । लिहुनी हुंडीसी दिधलें तेणें ॥७॥ नामा म्हणे धन्य नरसी मेहती । ऋणी देव होता हुंडी भरी ॥८॥