भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें

svapnavat deh svapnavat sansar | nahin paravar duhkha tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
स्वप्नवत देह स्वप्नवत संसार । नाहीं पारावार दुःखा तेथें ॥१॥ काय त्याची गोडी लागसीसे मूढा । नाचतो माकोडा गारोड्याचा ॥२॥ स्त्री पुत्र धन कवणाचें तें आप्त । वायां भुललें चित्त म्हणें माझें ॥३॥ सावध होउनी गाये रामनाम । एका जनार्दनीं विश्राम तेणें तुज ॥४॥