भजनी मालिका

भजने

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥ ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांडीं सांडीं पसारा विषयाचा चारा । विठ्ठल मोहरा वोळंगे वेगीं ॥१॥ होईल तुझें हित होसिल पूर्ण भरित । सर्वांभूतीं हित हेचि दया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांडुनी वैकुंठ न धरत पातलों । तुज भेटावया आलों पुंडलिका ॥१॥ प्रीतीचा वोरसू ह्लदयीं दाटला । नुठेचि कां वहिला आलिंगना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम