भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडुनी संगत चाललीस पुढे

sanduni sangat chalalis pudhe

रचनाकार: संत बोधले · अभंग
सांडुनी संगत चाललीस पुढे । नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥ सांडुनी प्रपंच झालीस निराळी । आवडे वनमाळी द्वारकेचा ॥ २॥ साधु आणि संतांची घडलीसी सेवा । आवडती देवा वैकुंठीचा ॥३॥ बोधला म्हणे भक्ती हरिची करिसी । तेणेच पावशी मोक्षपद ॥४॥