भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची

sandila prapanch jahalonse udas | sarvabhaven kas dharili tumachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडिला प्रपंच जाहलोंसे उदास । सर्वभावें कास धरिली तुमची ॥१॥ आतां माझे हित करीं गा देवराया । नाही तरी वाया सहज गेलों ॥२॥ लौकिकांची चाड नाहीं मज शंका । तुम्हावांचुनी एका पाडुरंगा ॥३॥ एका जनार्दनीं पायाची आवडी । सर्व माझी जोडी नाम तुझें ॥४॥