भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव

sanduniyan pandharirav | kavanaten mhanon dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥१॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥ध्रु.॥ सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥ तुका म्हणे हरीहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥