भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं

sanda sanda vayan chhand | dhara govind manasin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडा सांडा वायां छंद । धरा गोविंद मानसीं ॥१॥ नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाहीं ॥२॥ पडाल यमाचे पीडणीं । लक्ष चौर्‍यांयशीं पतनीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥