भजनी मालिका
← भजनांकडे परत

साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी

sathisahasra vighnanvari | shivanam panchakshari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साठीसहस्र विघ्नांवरी । शिवनाम पंचाक्षरी ॥१॥ तो राजा देखेन । पर्वतु जेथें असे मल्लिकार्जुन ॥२॥ भक्तिभावाचें अंजन । साधावया निधान ॥३॥ मन मारूनि देईन बळी । साधा-वया चंद्रमौळी ॥४॥ भ्रांति पाटा फिटला । शिव मार्ग देखिला ॥५॥ विष्णुदास नामा पायाळ भला । तेणें मलयानिळ देखिला ॥६॥