भजनी मालिका

भजने

वेदान्त सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी निरसली ॥१॥ आगम निगम कासया दुर्गम । जनार्दन सुवर्म सांगितलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाहीं ॥१॥ बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी ॥१॥ तो न आणावा पैं दृष्टी । तोचि दोशी एक या सृष्टी । तो होईल महा कष्टी । हरीसिन भजतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥ कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥

रचनाकार: संत नामदेव

वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ॥१॥ नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांसी न कळे शास्त्रें पैं भांडती । श्रुति विवादती ब्रह्मालागीं ॥१॥ आवघेचि कर्मामुक्त उपदेश धर्म । हारपती पैं कर्में गुरुसेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥ जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥ नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोलें बोलत पांगुळलें ॥१॥ न कळेचि कोना शेषादिकां मती । कुंठिता निश्चितई राहियेल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदोक्त पठण करितां चढे मान । तेणें होय पतन कर्मभूमी ॥१॥ सोपें ते साधन संतांसी शरण । तेणें चुके बंधन जडजीवां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥ पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग । जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वेधल्या गोपिका सकळ । गोवळ आणि गोपाळ । गायी म्हशी सकळ । तया कृष्णाचें ध्यान ॥१॥ नाठवें दुजें मनीं कांही । कृष्णावांचुनीं आन नाहीं । पदार्थमात्र सर्वही । कृष्णाते देखती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥ नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेधिलें ज्यांचें मन सदा नामस्मरणीं । रामनाम ध्वनीं मुखीं सदा ॥१॥ प्रपंच परमार्थ त्यासी पैं सारखा । अद्वैती तो देखा भेद नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ