भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदान्त सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी निरसली

vedanta siddhant pahanen te ati | janardan bheti nirasali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदान्त सिद्धांत पाहणें ते आटी । जनार्दन भेटी निरसली ॥१॥ आगम निगम कासया दुर्गम । जनार्दन सुवर्म सांगितलें ॥२॥ न्यायमीमांसा पांतजली शास्त्रें । पाहतां सर्वत्र निवारलें ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण कृपा केली । भ्रांती निरसली मनाची ते ॥४॥