भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोलें बोलत पांगुळलें

veden sangitale puranin anuvadalen | shastra bolen bolat pangulalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेदें सांगितले पुराणीं आनुवादलें । शास्त्र बोलें बोलत पांगुळलें ॥१॥ न कळेचि कोना शेषादिकां मती । कुंठिता निश्चितई राहियेल्या ॥२॥ श्रुती अनुवादती नेती नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं ठेवुनी कटीं कर । उभा असें तीरीं भीवरेच्या ॥४॥