भजनी मालिका

भजने

पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥ होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥ आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पाहोनिया अधिकार । तैसें बोलावे उत्तर ॥१॥ काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आम्हीं जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतीयां ॥१॥ परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनि नेणते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आम्हां केलें पांडुरंगें ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायींचि । सर्व आनंदाची सृष्टि झाली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या ॥१॥ चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पिंगळा बोले महाद्वारीं । निशा सरली दिशा चारी । उठा उठा हो श्रीहरी । उदयो प्रकाशला दिनकरी ॥१॥ देवा शकून ऐकावा ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी । फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥ चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोंवरी । नाहींतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम