भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी । फिराविसी माज मान तरि तुझी थोरी

pinga mhanije pilangoni bhirabhiriyache pari | phiravisi maj man tari tujhi thori

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पिंगा म्हणिजे पिलंगोनि भिरभिरियाचे परी । फिराविसी माज मान तरि तुझी थोरी ॥१॥ चित्त हरिवरी गे ठेवूनि दे भोंवरी । नाहींतरी सर परती येथूनि जाय दुरी ॥२॥ वाउगाचि ताठा गे नाहीं वळवटा । येथें नाहिं काम तुझें जाई आल्या वाटा ॥३॥ निळा म्हणे निजानंदे कांपवी शरीर । धरुनियां निज मनीं रुक्मिणीचा वर ॥४॥