भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहोनियां भक्तनाथा । स्वयें दे आपुली कांता

pahoniyan bhaktanatha | svayen de apuli kanta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहोनियां भक्तनाथा । स्वयें दे आपुली कांता ॥१॥ देतां न पाहे मागेंपुढें । उदार त्रिभुवन थोकडें ॥२॥ देणें जयाचें अचाट । म्हणोनि नाम नीलकंठ ॥३॥ एका जनार्दनीं भोळा । पाळों जाणें भक्तलळा ॥४॥