भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे

pahon granth tari ayushya nahin hatin | nahin aishi mati artha kale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥ होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥ एखादा अंगासी येईल प्रकार । विचारितां फार युक्ती वाढे ॥२॥ तुका म्हणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥३॥