भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें

pahon jatan dekhane tenchi | janata jananenchi hoije angen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहों जातां देखणे तेंचि । जाणता जाणणेंचि होईजे अंगें ॥१॥ आतां कैसें सांगावें यावरी । बोलतांचि वैखरी गिळूनि जाये ॥२॥ बुध्दीच्या प्रवेशें हरपे । मन जेथें संकल्पेंसहित विरे ॥३॥ निळा म्हणे चित्ता नुरे चित्तपण । आनंदा मुरवण आनंदें त्या ॥४॥