भजनी मालिका

भजने

पाहिली गे माय पूर्वभूमि आपुली । बहुत सन्मानिली वैष्णवांनीं ॥१॥ चैत्रमास शिवरात्र उत्सव आगळा । जावें पां वेरुळा घृष्णेश्वरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहिलें श्रीशैल्य निवृत्ती संगम । पापराशी भस्म देखतांचि ॥१॥ चालतां सुपंथीं ह्रदयीं विठठलमूर्ति । मुखीं नामकीर्ति गात चाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥ मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥ आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥ तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥ कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥ पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहे चहूंकडे धुंडोनि सुंदरी । देखे मुष्टी चारी तंदुळिका ॥१॥ तोचि शुद्धभाव उगवला पुढें । सर्वही तें कोडें देवालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाहों गेलिया वो नंदाचा नंदन । नेत्रीं लेऊनियां आतींचे अंजन । जेथें उभा होता राजीवलोचन । भोंवते मेळवुनी गडि संतसज्जनें वो ॥१॥ दृष्टी तेथेंहि निवाली वो इंद्रियें सकळ । जालि तटस्थचि देखोनियां घननीळ । मुकुट विराजित कुंडलें वनमाळ । सुंदर श्रीमुख चतुर्भुज सरळ वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा