भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहेंपा ध्वजेचें चिरगुट

pahempa dhvajechen chiragut

पाहेंपा ध्वजेचें चिरगुट । राया जतन करितां कष्ट ॥१॥ तैसा मी एक पतीत । परि तुझा मुद्रांकित ॥२॥ मसीपत्र तें केवढें । रावो चालवी आपुल्या पाडें ॥३॥ बापरखुमादेविवरदा । सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥