भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या

pahun dyare maj vithobachen mukh | lagalise bhuk dolan majhya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पाहूं द्यारे मज विठोबाचें मुख । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१॥ कस्तुरी कुंकुम भरोनियां ताटीं । अंगीं बरवंट गोपाळाच्या ॥२॥ जाईजुई पुष्पें गुंफोनियां माळां । घालूं घननीळा आवडीनें ॥३॥ नामा म्हणे विठो पंढरीचे राणे । डोळियां पारणें होत असे ॥४॥