भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले

pahuniyan hari gopalanche choj | mhane yenen to nirvanichen nij mandiyale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥ मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥ कळवळला देव जाहालासे घाबरा । मुरली अधरा लावियेली ॥३॥ मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥ यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥ पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं । एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥