भजनी मालिका

भजने

देहाचा पालट विठोबाचे भेटीं जळ लवणा गांठी पडोन ठेली ॥१॥ धन्यमायबापनामदेवमाझातेपंढरिराजादाखविलें॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥ सांडोनि उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहाचिये माथां काळाची तों सत्ता । म्हणोनि सर्वथा घोका राम ॥१॥ आदि मध्य अंतीं काळ लागलाहे । क्षणक्षणां पाहे वास त्यासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहाची आशा टाकिली परती । केलीसे आरती प्रपंचाची ॥१॥ स्थूल सुक्ष्म यांची रचूनियां होळीं । दावाग्नि पाजळीं भक्तिमंत्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी ॥१॥ भरिला भरिला सागर भरिला । उतरीं का रे वाहिला संतसंगे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥ पुजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेंपुढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥ तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहीं कैंचे सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ॥१॥ देहीं कोण देव कोण । भक्त कोण शांत कोण अशांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देही धर्म विहित करी । अद्वैत भाव चित्तीं धरी । सर्वभावे नमस्कारी । एक आत्मा म्हणोनी ॥१॥ तेणें तुटे रे बंधन । वाचे जपे जनार्दन । आणिक नको रे साधन । रामकृष्ण स्मर सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं न धरी जो आशा । चित्त पंढरीनिवासा । स्मरणाचा ठसा । रात्रंदिवस जयातें ॥१॥ तोचि होय हरीचा दास । तेणें पुरती सर्व सायास । नाहीं आशापाश । चिंतनावाचुनी सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं वाढें जों जों शांती । तों तों विरक्ति बाणें अंगीं ॥१॥ ऐसा आहे अनुभव । देहीं देव प्रकाशे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहीं शत्रु वसती दुर देशीं । येतां बहु दिवस लागती तयांसी ॥१॥ बाह्म शत्रुंचें अल्प दुःख । मनःशत्रुंचें वर्म अशेख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ