भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी

dehachi mamata na dhari sachar | kari kan ren vichar pailathadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहाची ममता न धरी साचार । करी कां रें विचार पैलथडी ॥१॥ भरिला भरिला सागर भरिला । उतरीं का रे वाहिला संतसंगे ॥२॥ नामाची सांगडी बांधीत निर्धारें । तेणें पैलपार तरसी देखा ॥३॥ सांगड नामाची धरी प्रेमभावें । संता शरण जावें एकविधा ॥४॥