भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे

dehachen deul devalinch dev | janardan svayamev ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहाचें देऊळ देवळींच देव । जनार्दन स्वयमेव उभा असे ॥१॥ पुजन तें पुज्य पूजकु आपण । स्वयें जनार्दन मागेंपुढें ॥२॥ ध्यान तें ध्येय धारणा स्वयमेव । जनार्दनीं ठाव रेखियेला ॥३॥ एका जनार्दनीं समाधी समाधान । पडिलें मौन देहीं देहा ॥४॥