भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं

dehachen mamatva nahin jon tutalen | vishayin kitalen man nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥ तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥ मीच एक भक्त मीच एक मुक्ता । म्हणती पतित दुराचारी ॥३॥ नामा म्हणे तुझे कृपेविण देवा । केंवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥४॥