भजनी मालिका

भजने

द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥१॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥ आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्रव्य घेऊनियां उपदेश देती । मार्जार ते होती जन्मोजन्मीं ॥१॥ द्रव्य घेऊनियां तीर्थयात्रा करिती । श्वान ते होती जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्रव्य घेऊनियां कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥ माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्रव्य घेऊनियां कथा जे करिती । उभयतां जाती नरकामध्यें ॥१॥ तयांचियां दोषां नाहीं परिहार । वेदाचा विचार कुंठितची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥ करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥ निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्रव्याचिये आशे करी जो कथा । चांडाळ तत्त्वतां जाणावा तो ॥१॥ द्रव्याचिये आशे वेद जे पढती । रवरव भोगिती कल्पवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वापरी अवतार आठवा । कंसासुर वधियला श्रीकृष्ण साठवा ॥१॥ तो़चि महाराज चंद्रभागेतटीं । उभा राहिलासे कर ठेऊनि कटीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥ रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

द्वारका समुद्रांत बुडविली । परी पंढरी रक्षिली अद्यापि ॥१॥ द्वारकेहुनि बहुत सुख । पंढ रीये अधिक एक आहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ