भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा

dravyachiya magen kilakalacha lag | mhanoniyan sang khota tyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । म्हणोनियां संग खोटा त्याचा ॥१॥ निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥ आजिच्या प्रसंगें हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥ प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥३॥ तुका म्हणे घेई राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥४॥