भजनी मालिका

भजने

ज्ञानदेव म्हणे तूं भक्तशिरोमणी । जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥ प्रेमसुख गोडी तुजची फावली । वासना मावळली सकळ तुझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा । तूम सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥ प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या ह्रदयीम आला । तूं का वेळोवेळां खंती करिसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज । कळलें गौप्यगुज सर्व तुझें ॥१॥ धीर आणि चतुर सर्वस्वेम उदार । साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानदेव म्हणे भाजनें आणावीं । तंव तीं देखिलीं अवघीं दिव्यरुप ॥१॥ उचलोनी करीं घेतलें भाजन । विठ्ठल विठ्ठल जाण शब्द निघे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनीं । दृष्टि दुजेपणीम न ठेवावी ॥१॥ सुखें सुख घ्यावेम अनुभवोनी अनुभवावें । आहे तें आघवें ब्रह्मरुप ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या ॥१॥ गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा । घेती वोसंगळा नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानदेवें उपदेश करुनियां पाहीं । सोपान मुक्ताई बोधियेली ॥२॥ मुक्ताईनें बोधखेचरासी केला । तेणे नामियाला बोधियेलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ज्ञानराजासाठीं स्वयें भिंत वोढी । विसरुनी प्रौढीं थोरपण ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । कट धरूनी करीं तिष्ठतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानराजें बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठानीं ॥१॥ भोजलिंग ज्याची समाधी आळंदीं । ज्ञानराज बोधी तिघांजणां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ज्ञानविज्ञान हरि । नांदे आमुच्या घरीं । बाह्यजु अभ्यंतरी जाला देव ॥१॥ काय सांगूं माय । त्रिभुवन धाय । पाहातां न समाय । नाना रुपीं ॥ध्रु०॥