भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी

dnyanadevo mhane vithathalasi | samadhan tunchi hosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी । परि समाधि हे तुजपासीं । घेईन देवा ॥१॥ नलगे मज मुक्ति । नलगे मज मुक्ति । तुझां चरणीं आर्ती । थोर आथी ॥२॥ विठोजी म्हणे ज्ञानदेवा । ज्ञानसागरा अनुभवा । वचनेंचि विसांवा । जाला मज ॥३॥ ऐकें ज्ञानचक्रवर्ती । तूं तंव ज्ञानाचीच मूर्ती । परि पुससी जे आर्ती । ते कळली मज ॥४॥ येक येक अनुभव कृपा । पद पदांतरें केला सोपा । परि यांत माझिया कृपा । सकळही वोळली ॥५॥ ज्ञानदेवें चरणीं मिठी । मनेंसी पडली एके गांठी । दृश्यादृश्य जाली एक दृष्टी । प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥ कर ठेउनी कुरवाळी । सर्वांग न्याहार न्हाहळी । म्हणे तुवाम घेतली जे आळी । ते सिद्धितें पावेल ॥७॥ नामा उभा असे सन्मुख । ऐकतां थोर खेद दुःख । म्हणे ज्ञानांजन महासुख । समाधि घेतसे ॥८॥